कायगाव येथील हॉटेल जय भवानीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

Foto
२३ जुगाऱ्यांवर गुन्हा, १४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

गंगापूर, (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील कायगाव येथे मोठी कारवाई केली. 

नवीन कायगाव येथील ङ्गहॉटेल जय भवानीफ येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी २२ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, हॉटेल चालकासह एकूण २३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण १४ लाख ३३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विनयकुमार राठोड यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. 

त्यानुसार दि. ११ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गोपनीय माहिती मिळाली की, नवीन कायगाव येथील ङ्गहॉटेल जय भवानीफ येथे काही इसम पैशांच्या हार-जीतवर जुगार खेळत आहेत. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. या छाप्यात २२ इसम अवैधरीत्या जुगार खेळताना रंगेहाथ आढळून आले. तसेच जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी हॉटेल चालक दीपक आसाराम बोरुडे याच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल राजेंद्र वाघमारे, सागर दशरत कदम, संतोष राजाराम घुसवकर, बाबासाहेब कचरू खाजेकर, गोपीनाथ गोविंद विटेकर, राहुल विश्वास पंडीत, अविनाश अशोक मिसाळ, गोरख सुभाष हिवाळे, जगन्नाथ सोनाजी दुशिंग, ज्ञानेश्वर पोपट औताडे, नितीन प्रभाकर गायकवाड, अकबर रशीद शेख, राम मारोती काळे, विश्वास दिलीप चंद्रनारायण, ज्ञानेश्वर श्रीरंग माने, गणेश कडु ठोंबरे, दत्तात्रय गोरख मगरे, सिताराम शंकर म्हस्के, विष्णू साहेबराव लोहगळे, महेश जानकीराम ढवळे, छबु हौसीराम वाघाडीकर, नितीन बबन जगताप आणि दीपक आसाराम बोरुडे यांचा समावेश आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आरती पवार, विनय सोनवणे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सपोनि पवन इंगळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला.